vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक*

पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक*

 

सातारा प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२” अभियानात शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव, ता-खटाव, जि-सातारा या शाळेने शासकीय शाळा गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून शासनामार्फत शाळेस ११ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे, अशी माहिती प्राचार्य विजय गायकवाड यांनी दिली. शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव ही राज्य शासनाची निवासी शाळा आहे. विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक मिळाले असून त्याचा वापर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या पायाभूत सुविधा शासन निर्णयांची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन – अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता चांगले आरोग्य, व्यावसायिक शिक्षणाची ओळख अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास, राष्ट्रीय एकात्मतेची भावना व्यक्तिमत्व विकासास चालना शासकीय विविध योजनांचा लाभ, या मुद्द्यांच्या आधारे शाळेचे मुल्यमापन करण्यात आले होते. शासकीय विद्यानिकेतनने वरील निकषांची पूर्तता करत यशाला गवसणी घातली आहे. शासकीय गटातील शाळेत आपली उंची मोठी केली आहे.

या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच माझी विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य विजय गायकवाड साहेब, गृहप्रमुख चंद्रकांत नरळे, कुलप्रमुख प्रकाश खेडकर तसेच शासकीय विद्यानिकेतनचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या यशाला गवसणी घालण्यासाठी परिश्रम घेतले

या यशाबद्दल कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मुजावर, शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी विभुते, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पालक व माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील हुशार मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी 14 सप्टेंबर 1966 रोजी राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात पाच ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन सुरू केली. पुणे विभागातील शासकीय विद्यानिकेतन हे पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन शासकीय विद्यानिकेतन पुसेगावने पुन्हा एकदा भौतिक व शैक्षणिक सुविधांचा दर्जा राखण्यात यश मिळवले आहे. सातारा जिल्ह्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची जी संधी दिली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार प्राचार्य श्री विजय गायकवाड यांनी मानले.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक -अखेर हिंदु संघटनांची मागणी मान्य; ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ संमत .आता खऱ्या अर्थाने ‘लाडक्या बहिणीं’चे संरक्षण होईल ..

सिंचन सुविधासाठी गाळ काढण्याबरोबरच केटी वेअर बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येईल- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. कालवा सल्लागार समिती बैठक डाव्या आणि उजव्या कालव्यातून प्रत्येकी चार आवर्तनास मान्यता..

लोकोत्सव’ सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ – मंत्री आदिती तटकरे

कन्नड येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी घेतला मतदार यादी विशेष सखोल पुनःरीक्षण कामाचा आढावा१०० टक्के काम पूर्ण केलेल्या बी एल ओ चा सत्कार