vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशव्यवसाय

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

नवी दिल्ली, प्रतिनिधी महाराष्ट्र सदनाचे निवास आयुक्त ( गुंतवणूक) सुशील गायकवाड यांची आज भारत सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) चे कार्यकारी संचालक व मुख्य सल्लागार राजेश शर्मा यांनी महाराष्ट्र सदनात भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स, सेल्युलर तसेच सेमीकंडक्टर उद्योगांच्या विस्तारासाठी संभाव्य सहकार्य, गुंतवणूक संधी आणि धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत राजेश शर्मा यांनी ICEA च्याभारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील प्रगती आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात सेमीकंडक्टर आणि मोबाइल उत्पादन क्लस्टर विकसित करण्यासाठी राज्य सरकारबरोबर भागीदारीच्या शक्यतेवर भर दिला.

सुशील गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या नव्या गुंतवणूक धोरणाची वैशिष्ट्ये, उद्योगपूरक वातावरण आणि केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांची माहिती दिली. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. ICEA सारख्या नामवंत संस्थांसोबत काम करण्यास शासन उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र हे इलेक्ट्रॉनिक्स व सेल्युलर उद्योगांचे देशातील प्रमुख केंद्र आहे. ICEA आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील हे सहकार्य या क्षेत्राच्या जलद वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल असा विश्वास राजेश शर्मा यांनी भेटीनंतर व्यक्त केला

संबंधित पोस्ट

अनुसुचीत जातींच्या आश्रम शाळांना VJNT शाळासंहिता लागू करुन नियमित वेतनश्रेणी प्रमाणे 100 टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणा-या आत्महत्या थांबवण्याचे विनंती..

बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप-विकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे

देशाचे मोठे व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रमी कमाई केली…

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या-आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम 23 एप्रिलला

शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम दि.१० पासून

vishwatmaklokswamivarta