मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांना वही पेन वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..
मुंबई प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दुपारी साडेबारा ते दोन या वेळात स्थळ समाज मंदिर सभागृह धारावी येथील कार्यालयात हराळे सेवा संघातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती संपन्न झाली
यावेळी शाळेतील विद्यार्थी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपली मनोगत व्यक्त केली तसेच श्री सुनील पवार श्री दिलीप गाडेकर व अनुसया माने यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ व चर्मकार समाज या विषयी माहिती देऊन समाजाला प्रबोधन केले
या कार्यक्रमात एक पेन एक वही या उद्देशाने जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी विभागातील महिलांचा फार मोठा सहभाग लागला तसेच तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते
सदर कार्यक्रमासाठी शंकर बळी विशाल कारंडे दिलीप गाडेकर किशोर जाधव आरती माने अलका साबळे सरिता शेरखाने यांच्या सहभाग लाभला कार्यक्रमाचे शेवटी सर्वांना चॉकलेट वाटप करण्यात आले शंकर बळी यांनी सर्वांचे आभार मानले