vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी-

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7 वा हप्ता जुलै 2025 च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. परंतु जिल्ह्यातील 4 हजार 290 शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि 4,705 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग(DBT Enable) अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना सन्मान निधीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाचे कृषि उपसंचालक अनुराधा गावडे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र शासनाकडून वार्षिक सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई- केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक असून बँक खात्याशी किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करण्याचे काम तत्काळ पूर्ण करून घ्यावे. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक, गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. मनोजकुमार ढगे बुलढाणा यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

पोलीस पाटील गिरीधर पाटील यांना मिळाला“विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार 2024”

झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी अधिकाधिक निधी आणणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील  जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, सन 2026-27 साठी एकूण 751 कोटी 8 लाखांचा प्रारूप आराखडा मान्य- उद्या राज्यस्तरीय बैठकीत आराखडा सादर होणार

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’ पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन