vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण महाराष्ट्र दिनी उद्घाटन सोहळा संपन्न

महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण महाराष्ट्र दिनी उद्घाटन सोहळा संपन्न

ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांचे दि.1 मे 2025 रोजी एकत्रीकरण होऊन नव्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापन झाली आहे. या एकत्रीकरणामुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवा अधिक व्यापक आणि सशक्त होणार आहेत.

मुख्य कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँक, क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथे स्थापना समारंभ आयोजित केला गेला. या स्थापना समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा सदस्य, वडगांव शेरी मतदारसंघ,पुणे आ.श्री.बापूसाहेब तुकाराम पठारे, जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड, पुणे विनीत भट, उप-व्यवस्थापक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, पुणे राजेश देशमुख आणि पुणे जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक योगेश पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी या ऐतिहासिक दिवशी होऊ घातलेल्या ग्रामीण बँकेच्या एकत्रित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उप क्षेत्रीय व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी यांनी मुद्देसूदपणे ग्रामीण बँकेच्या विस्ताराबाबत सर्वांना अनुमोदित केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीश चिवटे यांनी आपले अध्यक्षीय भाषण करून बँकेला विस्तारामुळे आलेल्या नवीन जबाबदाऱ्या व आवाहन याबाबत अवगत करून दिले.

कार्यक्रमासाठी बँकेचा प्रतिष्ठित ग्राहक वर्ग देखील उपस्थित होता. क्षेत्रीय कार्यालयातील तसेच शहरी शाखेतील सर्व अधिकारी-कर्मचारी देखील या स्थापना कार्यक्रमास उपस्थित होते.

हे एकत्रिकरण ग्रामीण बँकिंग क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा असून, यामुळे राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी बँकिंग सेवा आणखी सुलभ होणार आहेत.

कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीश चिवटे यांनी मान्यवर, पाहुणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सहभागाबद्दल आणि सतत पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून केला. या कार्यक्रमाप्रसंगी 100 पेक्षा अधिक ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये होणार पहिला टप्पा 16 मे ते 15 जून कालावधीत…

प्रतिबंधात्मक प्लास्टिक मोहीमेत प्लास्टिक पिशव्यांची वाहतूक करणा-या टेम्पोवर धडक कारवाई

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार

केंद्राच्या चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवण्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाचे आवाहन

मुंबईतील विलेपार्ले भागात स्थित साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या की, घातपात? कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा