vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मीरा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आढावा

मीरा-भाईंदर महापालिकेच्या विकासकामांचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आढावा…

मुंबई प्रतिनिधी –

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेऊन विकासकामे गतीने करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.मंत्रालय येथे मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह पुरातत्व, परिवहन, महसूल, पर्यावरण आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, मीरा-भाईंदर महापालिकेकडील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ती विहित कालमर्यादेत करावीत. महसूल विभागाने बी.एस.यू.पी. योजनेंतर्गत यापूर्वी हस्तांतर केलेल्या जागेपैकी सद्यस्थितीत झोपडपट्टी असलेल्या जागेत पीपीपी तत्त्वावर इमारती बांधकामांसाठी जागा मीरा भाईंदर महापालिकेला हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

विकासकामांचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावे, खाडी किनारा विकसित करणे व स्काय वॉकची जागा रिकामी करून काम सुरू करावे, चेना रिव्हर फ्रंट 18 मीटर जागेचे भूसंपादन करावे, महापालिका मुख्यालय भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी वर्ग करावा, पर्यटन स्थळ विकास, शिवसृष्टी प्रकल्प, कांदळवन उद्यान या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. घोडबंदर किल्ला व परिसरात कामे करण्याबाबत महापालिकेस परवानगी देण्याबाबतही मंत्री सरनाईक यांनी निर्देश दिले.

०००

 

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची बैठक-जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ साठी जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

राजकीय पक्षांनी यादीभाग निहाय बीएलए यांची नेमणूक करावी — जिल्हाधिकारी किशन जावळे

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास‍ शिंदे यांनी केली गवळीदेव पर्यटनस्थळ विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी

मिरज शहरात कायमस्वरूपी सुधारित वाहतूक नियमन- फुलारी कॉर्नर ते दत्त चौक, दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक एकेरी मार्ग

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजनमोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे