vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

अमरावती, प्रतिनिधी : विविध आस्थापनांवर सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून स्वच्छतेचे काम करून त्यांना असलेल्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मैला उचलणाऱ्या आणि गटार साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यास प्रतिबंध व पुनर्वसन, तसेच अधिनियम 2013 च्या अंमलबजावणी व सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्यासह संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. डागोर यांनी सफाई कामगारांच्या निवासस्थानाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची 25 वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना पट्टेवाटप, त्यावरील घरकूल याचा प्रस्ताव शासनास सादर करावा. तसेच श्रम श्राफल्य योजनेतून घर बांधण्यासाठी सहकार्य करण्यात यावे. जिल्ह्यात या कर्मचाऱ्यांना आवाससाठी अंमलबजावणी करावी. यातील कोणतेही प्रकरण प्रलंबित राहू नये. याबाबत 1 महिन्याच्या आत कार्यवाही करावी. निवासस्थानासोबतच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी नियमित करण्यात यावी. यासाठी शिबीरे आयोजित करावेत.

इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच सफाई कामगारांनाही नियम लागू आहेत. आजाराच्या उपचाराची प्रतिपूर्ती देण्यात यावी. त्यांना आयुष्मान योजनाही लागू असल्याने त्यांचे कार्ड काढण्यात यावेत. तसेच कॅशलेस सुविधा उपलब्ध होण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करावी. कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टी देण्यात यावी. कर्मचारी निवृत्त किंवा मृत झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना विनाविलंब सर्व लाभ देण्यात यावेत. आदिवासी विकास विभागातील धारणी येथील कर्मचाऱ्यांची दहा वर्षे सेवा होऊनही कायम करण्यात आलेले नसल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. डागोर यांनी दिले.

000000

संबंधित पोस्ट

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

गोल्डमन सॅक्सच्या नव्या मुंबई कार्यालयाचे  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

देशभरातली बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात, मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिम उद्यापासून होणार सुरु -मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा.

vishwatmaklokswamivarta

घणसोली विभागातील 21 शाळांमधील 13 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली ‘मतदार जागरूक दूत’ महाप्रतिज्ञा..

vishwatmaklokswamivarta

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा – मंत्री संजय राठोड