vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात यलो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

*15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात यलो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

रायगड प्रतिनिधी- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 15 मे 18 मे 2025 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात गडगडाट होवून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची, वीज चमकण्याची व ताशी 40 ते 50 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.या कालावधीत नागरिकांनी सतर्क रहावे, काळजी घ्यावी तसेच आवश्यकता भासल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहॆ.

दैनंदिन हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावर दररोज उपलब्ध करून देण्यात येत आहॆ. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा अफवा पसरवू नये. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 8275152363, 02141-222118 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्‍याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.
15 ते 18 मे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत करण्यात येत आहे.
वीज चमकत असताना विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा

vishwatmaklokswamivarta

संविधान अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम; 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

आज वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 1 मे रोजी मुंबईत

जिल्हा परिषद अनुकंपा उमेदवारांचीतात्पुरती सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्दआक्षेप, हरकतींसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार;”भारताची राज्यघटना” विषयावर संबोधन..

vishwatmaklokswamivarta