vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

रायगड प्रतिनिधी : अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग ते धरमतर या मार्गांवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याठिकाणी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, या मार्गांवरून मांडवा जलवाहतूक सेवा, पर्यटकांची वाहने तसेच डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर सारखी अवजड वाहने एकाच वेळी ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते.

या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरिता, दि. १७ व १८ मे २०२५ आणि दि. २४ व २५ मे २०२५ या दोन आठवड्यांत सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत या मार्गांवर जड व अवजड वाहनांची वाहतूक बंदी घालण्यात आली आहे.

ही वाहतूक बंदी फक्त जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांकरिता लागू राहणार नाही. त्यामध्ये दूध, डिझेल, गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला वाहतूक करणारी वाहने, पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व महिला  सशक्तीकरण  कार्यक्रमासाठी आवश्यक असलेले वाहने

संबंधित पोस्ट

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना;जनजागृतीसाठी पाणलोट यात्रा..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सरासरी 35 मि.मी. पावसाची नोंद

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in