vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

रायगड प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist ट्रेन अंतर्गत 09 जून 2025 पासून सुरू होत आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहॆ. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शासन यांच्यावतीने भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा मानस आहे. ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. या 5 दिवसांच्या विशेष सहलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. आरक्षण व अधिक माहिती साठी

www.irctctourism.com*या संकेत स्थळाला भेट द्यावी. 

भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेच्या दरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल.प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, ज्ञानवृद्ध गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने याला भावनिक व आध्यात्मिक स्पर्श दिला जाईल. सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट शुभारंभ दिनांक: 09 जून 2025 कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती) प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंचन पाणीपट्टी वाढ अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगितच राहणार – जलसंपदा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील,पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चार प्रकल्पांचा आढावा..

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

२१ जून रोजी ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा; नागरिकांनी सकाळी ६:४५ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन