vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

२१ जून रोजी ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा; नागरिकांनी सकाळी ६:४५ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन

२१ जून रोजी ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा; नागरिकांनी सकाळी ६:४५ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन

 

     ठाणे, प्रतिनिधी: संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून घोषित केला आहे. भारताची सुमारे ५००० वर्षांची प्राचीन योग परंपरा ही संपूर्ण जगाला लाभलेली अमूल्य देणगी असून, व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. त्यानुसार दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.   महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार,दि. २१ जून २०२६ रोजी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.      यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, औद्योगिक प्रतिष्ठाने, क्रीडा व युवक मंडळे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून योग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

     तालुका क्रीडा संकुलात योग शिबिराचे आयोजन…    जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने पतंजली योग समिती, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, ठाणे तसेच इतर योग संस्थांच्या सहकार्याने दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ६:४५ वाजता, तालुका क्रीडा संकुल, ठाणे (कोपरी) येथे मुख्य आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे (योग शिबिर) आयोजन करण्यात आले आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी ठाण्यातील सर्व नागरिकांना, संस्थांना आणि योगप्रेमींना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनाही राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिन सोहळयाचं निमंत्रण. 

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी….

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर झाले कार्निवलमय* *कार्निवलमध्ये पर्यटक नागरिक यांचा उस्फूर्त सहभाग**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ*

आयआयसीटी’ व शिक्षणाच्या क्षेत्रात युट्यूबने सहकार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट…

३ महिने पाठपुरावा करूनही ‘एस्.टी.’चे ७२% संपर्क क्रमांक ‘डेड’ आता आश्वासन नको; संपर्क यंत्रणा सुरू करा -‘सुराज्य अभियान’मुंबई आणि नवी मुंबई येथे परिवहन महामंडळाना निवेदन..

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे स्वीडन दौऱ्यावर मेरीटाईम क्षेत्राच्या विकासासाठी बैठक

vishwatmaklokswamivarta