vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ..

 मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीच्या कालावधीस 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

मंत्री शिरसाट म्हणाले, या समितीचा कालावधी 14 सप्टेंबर 2025 रोजी संपुष्टात येत असल्याने, या समितीस प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. समितीची कार्यकक्षा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे. या समितीस अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणे, तथ्यांची छाननी करणे, उपवर्गीकरणाची आवश्यकता सिध्द करणे आणि त्यानुसार प्रारुप आराखडा शासनास सादर करण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! – गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी..

vishwatmaklokswamivarta

महास्ट्राईड’ उपक्रमात सांगली जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणांचे अभिनंदन- सांगली जिल्हा राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा- जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा खासदार बळवंत वानखडे यांचे आवाहन

लोकसेवा हक्क अधिनियमाची संवेदनशीलतेने अंमलबजावणी करा – राज्य सेवा हक्क आयुक्त एन रामबाबू यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून सुरुवात*नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta