vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर, प्रतिनिधी: अनुसूचित जमातींच्या सामाजिक व आर्थिक उत्कर्षासाठी ‘प्रधानमंत्री जनजातीय न्याय अभियान’ आणि ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ यांचे एकत्रिकरण करून केंद्र शासनाच्यावतीने ‘आदि कर्मयोगी अभियान’ राबविण्यात येत आहे. आदि कर्मयागी अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 187 गावांमध्ये आदि सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून या गावांमध्ये आता ‘जन भागिदारी अभियान’ राबविण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी 18 ते 25 मे 2026 या कालावधीत सदर गावांमध्ये विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 18) बैठक घेऊन सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, गिरीश धायगुडे, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे आदी उपस्थित होते.

‘जन भागिदारी…सर्वात दूर, सर्वात पहिले’ या संकल्पनेवर आधारीत, जिल्ह्यातील 187 गावांमध्ये 19 ते 25 या कालावधीत गाव पातळीवर व्यापकता शिबिरे व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येईल. 20 मे रोजी संबंधित अधिकारी कर्मचारी, आदि कर्मयागी व स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन शिवार फेरीचे आयेाजन, 21 मे 23 मे या कालावधीत आदि सेवा केंद्राकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण आणि जलद निपटा-यासाठी दररोज सुनावणी, 24 मे रोजी दस्तऐवजीकरण व विविध प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच 25 मे रोजी अभियानात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे, याबाबत नियोजन करण्यात आल्याचे सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, आजपासून सुरू झालेले जन भागिदारी अभियान, आपापल्या क्षेत्रातील गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात यावे. संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर यंत्रणांनी आठवड्याभराचे नियेाजन करावे. विशेष शिबिरांचे आयोजन करून घरकुल, पट्टे वाटप, राशन कार्ड सोबतच अग्रीस्टॅक व फार्मर आयडीबाबतही मार्गदर्शन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

जन भागिदारी अभियानाचे उद्दिष्ट्ये : 1) आदि सेवा केंद्र असलेल्या 187 गावांमध्ये योजनांची माहिती पोहचविणे 2) ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, बचत गट यांच्या माध्यमातून जनजागृती 3) लाभार्थ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन 4) तक्रार निवारण आणि हक्कांबाबत जागरुकता 5) आदि सेवा केंद्रात प्राप्त झालेल्या तक्रारींची जनसुनावणी व निवारण 6) आरोग्य तपासणी, सिकलसेल जागरुकता, पोषण संदेश 7) राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे.

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद भाविकांनी सहकार्य करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

धुळे व नंदुरबार जिल्ह्याला शौर्य आणि बलिदानाचा गौरवशाली वारसा धुळ्यातील नूतन शहीद स्मारक त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देईल : पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशी इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta