vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह, राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी होणार उपलब्ध

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह, राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी होणार उपलब्ध

मुंबई, प्रतिनिधी : अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. बिकानेर येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री श्री.फडणवीस परळ रेल्वे स्थानक येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी कार्यक्रमानंतर संवाद साधला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वंदे भारत रेल्वे, नमो भारत रेल्वे, अमृत भारत रेल्वे अशा रेल्वेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचा कायापालट होत आहे. जर्मनीच्या रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त लांबीचे रेल्वेचे जाळे प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनात मागील ११ वर्षात उभारले आहे. विमानतळांच्या धर्तीवर सर्व रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. विमानतळ परिसरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधा या अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध असणार आहेत. मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोड या उपनगरीय स्थानकांसह राज्यातील १५ स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. जगातील आधुनिक रेल्वे प्रणालीमध्ये आता भारतीय रेल्वेचा समावेश होत

संबंधित पोस्ट

श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकलशारोहण समारंभ

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम’सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करावे’ – मुख्यमंत्री

जारीदासह परिसरातील ५० गावांसाठी खात्रिशीर विजेची सोय झाल्याने मेळघाटातील आदीवासी बांधव आणि महावितरणकडून मा. सरन्यायाधिश भुषण गवई यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

आदर्श आचारसंहितेतील प्रस्ताव छाननी समितीमार्फतच सादर करावेत 

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा अभिषेक सोहळा याचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त पूजा अर्चना करून प्रसाद वाटप भाजपाने धारावी विभागात केले

vishwatmaklokswamivarta

ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta