vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”

 

               बुलडाणा, प्रतिनिधी: शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती पद्धती, जलसंधारण आणि उत्पादनवाढ यासाठी कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल शेती शाळा” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सक्रियपणे सहभाग घेऊन शेतीत नवे तंत्र आत्मसात करून अधिक उत्पादनक्षम व पर्यावरणस्नेही शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

   या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामान बदलाचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, सेंद्रिय खतांचा वापर आणि पाण्याचा शाश्वत वापर याबाबत प्रशिक्षण देणे हा आहे. डिजिटल माध्यमातून उपलब्ध असलेल्या या प्रशिक्षणामुळे शेतकरी घरबसल्या ज्ञान घेऊ शकतील व आपल्या शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतील. “डिजिटल शेती शाळा” उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा www.digitalkhetishala.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

> डिजिटल शेती शाळाचे वेळापत्रक : झुमद्वारे मोफत प्रशिक्षण -वेळ व झुम आयडी/पासकोड खालीलप्रमाणे:

* बाजरी – 26 मे, सायं. 6:15 ते 7:15 ID: 89845701136 | Pass: 624786,

* खरीप ज्वारी – 27 मे, सायं. 6:15 ते 7:15 ID: 89024794378 | Pass: 237266

* भात – 28 मे, सकाळी 10 ते 12 ID: 83942449675 | Pass: 445624

* घेवडा (राजमा) – 29 मे, सायं. 6:15 ते 7:15 ID: 87366079713 | Pass: 626140

* भाजीपाला – 24 मे, सायं. 7:30 ते 9:30 ID: 83989924758 | Pass: 689151

000000

संबंधित पोस्ट

शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा..

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

नवलारी गडचिरोली: महिला सक्षमीकरणाचा ‘गड’

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.

वारी मार्गावरील विविध ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta