vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम-विभागस्तरावर संचालक (माहिती) कार्यालय छत्रपती संभाजीनगरला प्रथम क्रमांक;जिल्हास्तरावर लातूर जिल्हा माहिती कार्यालयाला प्रथम क्रमांक..

१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम-विभागस्तरावर संचालक (माहिती) कार्यालय छत्रपती संभाजीनगरला प्रथम क्रमांक;जिल्हास्तरावर लातूर जिल्हा माहिती कार्यालयाला प्रथम क्रमांक..

मुंबई, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेंतर्गत राज्याच्या सर्व महसुली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातील विभागस्तरावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने तर जिल्हास्तरावर लातूर जिल्हा माहिती कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व महसूली विभागातील ४० विभागस्तरीय कार्यालये व सर्व जिल्ह्यातील ४२ जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर केला. संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर या सर्वच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन करुन पुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहे संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर सर्वच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्व कार्यालयप्रमुखांचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी देखील अभिनंदन केले आहे.

विभागीय स्तरावरील कार्यालयांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छत्रपती संभाजीनगर येथील संचालक (माहिती) कार्यालयास प्रथम क्रमांक, अमरावती येथील उपसंचालक माहिती कार्यालयास द्वितीय क्रमांक, नागपूर येथील संचालक (माहिती) कार्यालयास तृतीय क्रमांक मिळाला आहे.

जिल्हा स्तरावरील कार्यालयांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लातूर येथील जिल्हा माहिती कार्यालयास प्रथम क्रमांक, कोल्हापूर येथील जिल्हा माहिती कार्यालयास द्वितीय क्रमांक, सातारा आणि परभणी जिल्हा माहिती कार्यालयास तृतीय क्रमांक मिळाला आहे.

संबंधित पोस्ट

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून अडीच कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारे लाडके भाऊ शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार होणार

vishwatmaklokswamivarta

माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाचे जीवन जगण्याचे पोलीस महासंचालक, म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे

vishwatmaklokswamivarta

चाकण एमआयडीसीतील रस्ते व पायाभूत सुविधांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे व पार्किंगच्या प्रश्नांचा घेतला आढावा; कालबद्ध उपाययोजनांच्या सूचना

भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती कराव-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांचा आढावा• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन