vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

वाळू मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा

वाळू मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा

बुलडाणा, प्रतिनिधी- नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे हिवरखेड पुर्णा घाटासाठी टाकरखेड वायाळ येथील गट क्रमांक 275 मध्ये वाळू डेपोमधून नागरिकांना वाळू विक्रीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी केले आहे.

मंजुर निविदेनुसार प्रतिब्रास वाळूचा दर निश्चित करण्यात आला असून निविदेनुसार मंजूर दर 553.50+ स्वामीत्वधन 600 रुपये+डिएमएफ 10 टक्के 16.52 असे 1 हजार 230 रुपये दर निश्चित करण्यात आले आहे. वाहतुक खर्च हा ग्राहकाकडे राहिल. नागरिकांनी वाळू नोंदणीकरीता ऑनलाईन पद्धतीने htpps://Mahakhanij.maharashtra.ov.in या संकेतस्थळावर सेतू सुविधा केंद्र किंवा ई महासेवा केंद्रातून महाखनिज प्रणालीवर वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवावे. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर ग्राहकांने 15 दिवसाच्या आत वाळू घेऊन जाणे बंधनकारक आहे.

0000000

संबंधित पोस्ट

मुंबईत कॉटन ग्रीन येथे केंद्र सरकारच्या कार्यालय संकुलाची उभारणी करण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने एनबीसीसी बरोबर केला करार

vishwatmaklokswamivarta

नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026’ एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! 🚀

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे येथे 13 फेब्रुवारी,2026 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून लघु उद्योगासाठी अर्थसहाय..

vishwatmaklokswamivarta

​भारतीय अन्न महामंडळाकडून महाराष्ट्रात खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) तांदूळ विक्रीची घोषणा

vishwatmaklokswamivarta