vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्र्यांचे निर्देशप्रशासनाला फिल्डवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश – ना.मकरंद जाधव-पाटील

मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्र्यांचे निर्देशप्रशासनाला फिल्डवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश – ना.मकरंद जाधव-पाटील

बुलडाणा, ( प्रतिनिधी: जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपिके, फळबागा आणि काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडल्यामुळे जीवितहानी, पशुधन हानी तसेच रस्त्यांचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक, कृषी सहायक आणि तलाठी यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून पंचनामे तातडीने पूर्ण करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मान्सून कालावधीत प्रशासनाने कार्यालयीन चौकटीपलीकडे जाऊन थेट फिल्डवर जाऊन काम करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. पाटील यांनी दिले आहे.

  दरम्यान, राज्यात सध्या अवकाळी पावसाने जोर धरलेला असून काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे व पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहनही पालकमंत्री जाधव-पाटील यांनी यावेळी केले.

000000

संबंधित पोस्ट

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी विधि व न्याय विभागाचे मार्गदर्शन घ्यावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय,अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी-केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मदत करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील ‘मिनी सरस-२०२५ प्रदर्शनास’ भेट

vishwatmaklokswamivarta

आधुनिक चित्रनगरी उभारणीने नाशिकच्या आर्थिक, सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार तज्ज्ञ सल्लागारांच्या अहवालानंतर व्यवहार्यता तपासून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी शाळकरी विद्यार्थिनींनी रक्षाबंधननिमित्त राख्या बांधल्या आणि या सणाच्या शुभेच्छा दिल्या.