vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम 

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम

 सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील कोणताही घटक उपेक्षित राहू नये, यासाठी प्रशासन संवेदनशील असून, घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशानुसार आणि आटपाडी तहसीलदार सागर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात घरेलू कामगारांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

 या उपक्रमात गहू, तांदूळ, डाळी, साखर आदि साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रत्येक लाभार्थीच्या घरी जाऊन पात्रतेची खातरजमा करण्यात आली. ज्यामुळे यादीतील पारदर्शकता आणि वितरणात अचूकता राखली गेली.

  या उपक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, आटपाडी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी जयश्री बाजड (हिवसे), निवासी प्रभारी नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे, अन्नसुरक्षा निरीक्षक नितीन शिंगाडे, तसेच महसूल व पुरवठा विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.घरेलू कामगार समाजातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या अडचणींची दखल घेऊन गरजूंपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. लाभार्थींनीही प्रशासनाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “आमच्यासारख्या कामगार कुटुंबांना वेळेवर धान्य मिळाले, हे आमच्यासाठी खूप मोठे आहे,” असे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.

    प्रशासनाने या उपक्रमाला नियमित स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, गरजूंच्या सन्मानाची जपणूक करत यापुढेही असे उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

000000

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

ढेबेवाडी येथील बस अपघातातील जखमींवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार तात्काळ उपचार….

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना

मोरबे धरण आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणीव्दारे घेतला सविस्तर आढावा