vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एन. डी. आर. एफ. पथकाने सतर्क राहून कामकाज करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

एन. डी. आर. एफ. पथकाने सतर्क राहून कामकाज करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

 सांगली, प्रतिनिधी : संभाव्य पूरपरिस्थिती व आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने सतर्क राहून कामकाज करावे. संभाव्य पूरप्रवण भागाची, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावांची पाहणी करावी. मदत व बचाव कार्याच्या अनुषंगाने स्थानिक पूर्वमाहिती घ्यावी. लोकांमध्ये आपत्तीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.

 आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पथक प्रमुख संतोषकुमार तिवारी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, व पथकातील जवान उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आगामी मान्सून व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सज्ज असून, बचाव व मदत कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाची मदत महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी स्थानिक प्रशासन, पोलीस दल व संबंधित विभागाशी समन्वय ठेवून कामकाज करावे. आपत्कालिन परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने त्वरित प्रतिसाद द्यावा. जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक ठिकाणी मदतकार्य पोहोचविण्यासाठी त्यांच्या साधनसामुग्रीसह दक्ष राहण्याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.

 मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी.आर.एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी, मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी.आर.एफ) एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘पर्यटनाचा महाकुंभ 2025’ चे आयोजन…

कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठीउद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार – कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती-29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार- राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

3 ते 9 ऑक्टोबर कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका करणार अभिजात मराठी भाषेचा जागर…

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा नवी मुंबईत संपन्न…