vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद…

ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद…

आरोग्य प्रतिनिधी ठाणे – ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कर्करोग मोबाइल व्हॅन कार्यरत असून, नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे.    जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्हॅनचे प्रभावीपणे संचालन केले जात आहे.

 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोबाइल व्हॅनद्वारे मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जात आहे. ही व्हॅन आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात न जाता त्यांच्या परिसरातच ही सेवा मिळते.

   फेब्रुवारी २०२५ व मे २०२५ या दोन महिन्यातील कालावधीत एकूण ४४९० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये २३७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.

   कर्करोग हा असंसर्गजन्य आजार असून त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु वेळीच निदान झाल्यास योग्य उपचाराद्वारे रुग्णाचे आयुष्य वाचवता येते. याकरिता कर्करोग मोबाइल व्हॅन उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

000

संबंधित पोस्ट

लायंस क्लब नवी मुम्बई चैंपियंस ने सानपाड़ा में रविवार को आयोजित किया मुफ्त महाआरोग्य शिविर.. 

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवावी –मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

vishwatmaklokswamivarta

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत दरम्यान, या रुग्णसंख्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण महत्वपूर्ण – आयुषी सिंह हिवताप चाचणी प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन

नमो नेत्र संजीवनी अभियानाव्दारे हजारो रूग्णांच्या आयुष्यात प्रकाश- या अभियानात 29 सप्टेंबरअखेर 9 हजार 385 रूग्णांची तपासणी, 1 हजार 5 शस्त्रक्रिया..