vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवावी –मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवावी –मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

 

 

रायगड प्रतिनिधी- जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान आशासेविका, स्वंयसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधणार आहेत. जनजागृती, तपासणी व उपचार या त्रिसुत्रीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी आज आढावा बैठकीत दिल्या..

 

रायगड सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या सयुक्त विद्यमाने कृष्ठरोग व सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान 2023 जिल्हा समन्वय समितीची बैठक डॉ.भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या मोहिमेअंतर्गत 354 पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली 1 हजार 958 पथके स्थापन करण्यात आली आहेत. शोध अभियाना दरम्यान नागरिकांनी क्षयरोग व कुष्ठरुग्ण या आजाराबाबत गैरसमज व भिती न बाळगता घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ.बास्टेवाड यांनी यावेळी केले.

 

 

 

कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 24 लाख 56 हजार 871 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, गृहभेटी दरम्यान 5 लाख 69 हजार 492 घरांचे भेटीचे नियोजन केले आहे. मोहिमेअंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे.

 

या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी सचिन जाधव उपस्थित होते.

 

00000000

संबंधित पोस्ट

स्टॉप डायरिया’ मोहीम प्रभावीपणे राबवा- अपर जिल्हाधिकारी अडकूणे

जिल्हा व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबीर

बाजार भरविण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

सार्वजनिक आरोग्य विभाग‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद* १ कोटीहून अधिक नागरिक लाभार्थी*७५ लाख ८७ हजार पेक्षा जास्त महिलांची तपासणी..

नवी मुंबई-आरोग्य विभाग हिवताप / डेंग्यु शिबिरांचे प्रभावी नियोजन