vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

वाळू मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा

वाळू मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करा

बुलडाणा, प्रतिनिधी : नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे हिवरखेड पुर्णा घाटासाठी टाकरखेड वायाळ येथील गट क्रमांक 275 मध्ये वाळू डेपोमधून नागरिकांना वाळू विक्रीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी अजितराव जंगम यांनी केले आहे.

  मंजुर निविदेनुसार प्रतिब्रास वाळूचा दर निश्चित करण्यात आला असून निविदेनुसार मंजूर दर 553.50+ स्वामीत्वधन 600 रुपये+डिएमएफ 10 टक्के 16.52 असे 1 हजार 230 रुपये दर निश्चित करण्यात आले आहे. वाहतुक खर्च हा ग्राहकाकडे राहिल. नागरिकांनी वाळू नोंदणीकरीता ऑनलाईन पद्धतीने htpps://Mahakhanij.maharashtra.ov.in या संकेतस्थळावर सेतू सुविधा केंद्र किंवा ई महासेवा केंद्रातून महाखनिज प्रणालीवर वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवावे. दि. 9 जून 2025 चे सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाळू डेपोमध्ये जमा झालेल वाळू साठा ग्राहकांच्या नोंदणीसाठी दि. 12 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरु करण्यात येत आहे. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर ग्राहकांने 15 दिवसाच्या आत वाळू घेऊन जाणे बंधनकारक आहे. 0000000

संबंधित पोस्ट

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

आजच्या या पावसाच्या दिवसात एअरटेलची सेवा ठप्प! नेटवर्क डाऊन, युझर्स फोन करुन कंटाळले

vishwatmaklokswamivarta

नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…