vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार 

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार

 

सातारा प्रतिनिधी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी व वेदनादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे येथील त्यांच्या गावी मुक्कामी असून या ठिकाणी ते माध्यमांशी बोलत होते.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुंडमळा हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. त्या ठिकाणी इंद्रायणी नदीवर जुना लोखंडी पूल पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून आपण घेतली असून सदरची घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. 38 लोकांना एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. त्यांना स्थानिक लोक ही मदत करत आहेत, बचाव कार्य सुरू आहे. दोन लोकांचा यामध्ये मृत्यू झाला असून सहा लोक जखमी आहेत. जखमींना उपचार करणे व त्यांच्या जीव वाचवणे यासाठी प्रयत्न चालू आहेत. जे लोक दुर्घटनेत सापडले आहेत, त्यांना लवकरात लवकर शोधून बाहेर काढणे याला प्राधान्य प्रशासन देत आहे असे सांगून

अशा सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे, अशा सूचना दिल्या जातील. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल, असेही श्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय..-सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट; जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका

महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा नागरी सत्कार,- शिक्षण, समाजसेवेच्या प्रदीर्घ वाटचालीला मानाचा मुजरा- ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचे लोकार्पण

मुंबई शहर जिल्ह्यात 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान

vishwatmaklokswamivarta

प्रहारची ‘धार’ अन् प्रशासनाची झाली ‘हार’!धाड येथील आठवडी बाजारासाठी महामार्गावरच थाटली दुकाने; भरचौकात ठोकला उपोषण मंडप

नगर परिषद निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकारी यांची अंबड येथे भेट

vishwatmaklokswamivarta

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत