vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून लासलगाव मुख्य बाजारपेठेतील पुलाच्या कामाची पाहणी

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून लासलगाव मुख्य बाजारपेठेतील पुलाच्या कामाची पाहणी

नाशिक, प्रतिनिधी:- लासलगाव पाटोदा रस्त्यावरील परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या लासलगाव मुख्य बाजार पेठेतील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

लासलगाव पाटोदा रस्त्यावर लासलगाव मुख्यबाजार पेठेत ४.५० कोटी निधीतून पुलाचे काम करण्यात येत आहे. या सुरू असलेल्या कामाची मंत्री श्री. भुजबळ यांनी पाहणी केली. त्यावेळी ते सबंधित अधिकाऱ्यांशी बोलत होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.आर.घोडे, अभियंता संकेत चौधरी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

लासलगाव पाटोदा रस्त्यावरील बाजारपेठेतील पुलाच्या कामाला पुढे साठलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे कामास अडथळा येत आहे. याबाबत तातडीने या बंधाऱ्याचे द्वार उघडून द्यावे, अशी सूचना तहसीलदार विशाल नाईकवाडी व संबंधित अधिकाऱ्यांना केली. तसेच पाटोदा रस्त्यावरील हा पूल अनेक गावांना जोडणारा आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन महिन्याच्या आत या पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

शिवनदी संवर्धनाच्या कामाला तातडीने कार्यारंभ आदेश द्यावा,राज्य नदी संवर्धन योजनेच्या माध्यमातून शिवनदी संवर्धनासाठी १२.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र कार्यारंभ आदेश नसल्याने काम अद्याप सुरू झालेले नाही. याबाबत पाहणी दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत तातडीने या कामाला कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करण्यात यावे अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड· जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वॉकेथॉन

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत – पालकमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भाईदर व मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल, अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर