vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

          मुंबई, द प्रतिनिधी:- कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५-३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

     राज्यात मागील २४ तासांमध्ये (२३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४, रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३ आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

   राज्यात कालपासून आज २३ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १४.३, रायगड १०.७, रत्नागिरी २५.८, सिंधुदुर्ग ३६.४, पालघर ७३.३, नाशिक ६.२, धुळे ०.५, नंदुरबार २.९, जळगाव ०.९, अहिल्यानगर ०.२, पुणे ४.३, सोलापूर ०.१, सातारा ४.७, सांगली २.८, कोल्हापूर १३.९, छत्रपती संभाजीनगर १, जालना १.१, धाराशिव ०.२, नांदेड ०.३, हिंगोली ०.४, बुलढाणा १.१, अकोला ३.४, वाशिम ०.४ अमरावती ०.५, यवतमाळ ०.६, वर्धा ०.२, नागपूर १.५, भंडारा ०.६, गोंदिया १.७, चंद्रपूर २.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.     ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

००००000

संबंधित पोस्ट

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज– संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ  • जिल्हा यंत्रणेचा आढावा

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली ‘कुंभमेळा’ विकास कामांची पाहणी सिंहस्थ कुंभमेळा २०२७

महिला सक्षमीकरण अभियान; महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा    ‘विधवा’नव्हे ‘पुर्णांगिनी’म्हणा- रुपाली चाकणकर…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत पीएसएफएस व एएसयूएसई सर्वेक्षणाला प्रारंभनागरिक, लघुउद्योजकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन

अती दुर्गम भागातील ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस