vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

डी.ए.पी. खतास पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन

डी.ए.पी. खतास पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन

          सांगली, प्रतिनिधी : खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांकडून डी.ए.पी. खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. डी.ए.पी. खतात १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद ही मुलद्रव्ये आहेत. डी.ए.पी. खताला पर्यायी खते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या पर्यायी खतांचा शेतकऱ्यांनी वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

      एक गोणी डी.ए.पी. खतास पर्याय पुढीलप्रमाणे – पर्याय – १ – १/२ गोणी युरिया + ३ गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट खतामधून गंधक मुलद्रव्य मिळते. पर्याय – २ – १/२ गोणी युरिया + १ गोणी ट्रिपल सुपर फॉस्फेट. ट्रिपल सुपर फॉस्फेट खतामधून गंधक मुलद्रव्य मिळते. पर्याय – ३ – ३७ कि.ग्रॅ. २४-२४-०० + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. पर्याय – ४ – ४५ कि.ग्रॅ. २०-२०-०-१३ + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. खतामधून गंधक मुलद्रव्य मिळते. पर्याय – ५ – ७१ कि.ग्रॅ. १२-३२-१६. अतिरिक्त पोटॅश मूलद्रव्य मिळते. पर्याय – ६ – ५९ कि.ग्रॅ. १५-१५-१५ + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. अतिरिक्त पोटॅश व गंधक मूलद्रव्य मिळते. पर्याय – ७ – ५७ कि.ग्रॅ. १६-१६-१६ + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. अतिरिक्त पोटॅश व गंधक मूलद्रव्य मिळते. पर्याय – ८ – ४८ कि.ग्रॅ. १९-१९-१९ + ८७ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट. अतिरिक्त पोटॅश व गंधक मूलद्रव्य मिळते.

00000

संबंधित पोस्ट

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची खात्री करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली.

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

vishwatmaklokswamivarta

भारत सरकार पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन