vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेश मिळू शकत नाही अशांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज मागविण्याचे वेळा पत्रक निश्चित झाले आहे, असे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण दत्तात्रय वाघ यांनी कळविले आहे.

अर्ज करण्याची पद्धती व वेळापत्रकः-इच्छुक अर्जदारांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी दि.१९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा. अर्ज छाननी दि.३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. पहिली निवड यादी दि. ६ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यानुसार दि.१६ ऑक्टोंबर पर्यंत प्रवेशासाठी अंतिम मुदत असेल. तर रिक्त जागेवर प्रवेशासाठी दुसरी यादी दि.१७ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध होईल. दुसऱ्या निवड यादीतील प्रवेशासाठी दि.३१ऑक्टोंबर ही अंतिम मुदत असेल.

०००००

संबंधित पोस्ट

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी 23 मे रोजी मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण…

विशेष वृत्त-कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण तातडीने करा : प्रशासनाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta