vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

 

         राज्य प्रतिनिधी  जालना,:- जिल्ह्यात अनेक ठिकाणी खरेदी विक्री, वारसाद्वारे व इतर कारणास्तव मालकी हक्कामध्ये बदल होण्याचे अनेक विषय असतात. त्यामुळे फेर फाराची अनेक प्रकरणे तलाठी यांच्याकडे प्राप्त होत असतात. अनेक प्रकरणे वेळेत निकाली न निघाल्याने तसेच ती प्रलंबित राहिल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारी करत असतात. तरी सर्व प्रलंबित फेर फार तातडीने निकाली काढून शुल्य प्रलंबितता आणण्यासाठी जिल्हाभरात 2 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच दिवशी प्रत्यक्ष फेर फार अदालतीचे आयोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

 प्रलंबित फेरफार निकाली काढण्यासाठी सर्व मंडळ अधिकारी यांच्या मुख्यालयात दि.2 फेब्रुवारीला महसूल अदालतीचे आयोजन करण्यात यावे. दि.24 ते 27 जानेवारी 2025 कालावधीत तहसीलदारांनी त्यांच्या अधिनस्त मंडळनिहाय प्रलंबित असलेल्या फेरफाराचा आढावा घ्यावा. दि.28 ते 29 जानेवारी कालावधीत दुय्यम निबंधक यांच्याशी चर्चा करुन पाठविलेल्या खरेदी विक्री व्यवहाराचा आढावा घेण्यात येईल. दि.30 जानेवारीला फेरफार अदालतीचे नियोजन व प्रसिध्दी करण्यात येईल. दि.31 जानेवारी 2025 रोजी तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्यास्तरावर सुनावणीसाठी प्रलंबित फेर तात्काळ सुनावणी घेवून निकाली काढावेत तर दि.2 फेब्रुवारीला प्रत्यक्ष फेरफार अदालत घेण्यात यावी. सर्व मंडळ अधिकारी व त्याच्या अधिनस्त सर्व तलाठी यांना संपुर्ण दप्तरासह अदालतीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता हजर राहण्याच्या सुचना निर्गमित कराव्यात. मंडळ अधिकारी यांचे कार्यालय नसल्यास ग्रामपंचायत किंवा इतर शासकीय इमारतीच्या ठिकाणी अदालत घ्यावी. शेतकऱ्यांना, नागरिकांना, मंडळ अधिकारी व तलाठी यांना बसण्याच्या व्यवस्थेसह लागणारे साहित्य, संगणक प्रणाली, लॅपटॉप अद्यावतरित्या उपलब्ध करुन द्यावा. तसेच या ठिकाणी उपक्रमाचा फलक, इत्तिवृत्तासाठी तसेच स्वाक्षरीसाठी नोंदवही ठेवावी. फेरफाराबाबत वाद किंवा शंका असतील तर सुनावणी त्याच दिवशी अदालतीच्या ठिकाणी घ्यावी याबाबत दोन्ही पक्षकारांना आगाऊ नोटीस पाठविण्यात यावी. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी अदालतीचे संपुर्ण नियोजन करावे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर दुरस्ती करुन घ्यावी

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ पुरस्कार

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

कन्यादान योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध – अग्रिम निधी वितरित

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta