vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खाद्य तेल अभियान योजनेंतर्गत गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळणार गोदाम बांधकामासाठी ₹12.50 लाख ; तेल काढणी युनिटसाठी ₹9.90 लाखशेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे

खाद्य तेल अभियान योजनेंतर्गत गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी अनुदान मिळणार गोदाम बांधकामासाठी ₹12.50 लाख ; तेल काढणी युनिटसाठी ₹9.90 लाखशेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे

बुलढाणा, प्रतिनिधी : राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) 2025-26 अंतर्गत शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी, सहकारी संस्था व खाजगी उद्योगांना गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिटसाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी जुलै 2025 अखेरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केले आहे.

उत्पादित अन्नधान्याची साठवणूक सुधारण्यासाठी व अधिक भाव मिळवण्यासाठी गोदामाची आवश्यकता लक्षात घेऊन, योजनेत 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा ₹12.50 लाख (जे कमी असेल) इतके अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी स्मार्ट, वखार महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल, कर्ज मंजूरीनंतरच अनुदान पात्रता निश्चित होईल, अर्ज अधिक प्रमाणात प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या मान्यतेनुसार सोडत पद्धतीने निवड केली जाईल.

तेलबिया संकलन, प्रक्रिया व उत्पादन कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) उभारणीसाठी देखील प्रोत्साहनपर अनुदान उपलब्ध आहे. शासकीय व खाजगी उद्योग, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांना प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा ₹9.90 लाख (जे कमी असेल) इतके अनुदान मिळणार आहे.

तेलबियांवर प्रक्रिया करणारी यंत्रसामग्री, उपकरणे आणि प्रक्रिया युनिटसाठी हे अनुदान दिले जाईल.
संबंधित संस्थांनी बँकेकडे प्रकल्प सादर करून कर्ज मंजुरी घेणे आवश्यक आहे.
यासाठीचा अंतिम अर्ज सादरीकरण कालावधी जुलै 2025 अखेरपर्यंत ठेवण्यात आलेला आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संबंधित शेतकरी उत्पादक संघ किंवा संस्था यांनी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. अधिकाधिक शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक संघांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गणपती बाप्पा मोरया’ मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी!

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची विविध विकास कामांना भेट…

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा

राज्यात वातावरणात बदल – गुलाबी थंडीचा जोर वाढणार

vishwatmaklokswamivarta

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ज्येष्ठांनी मारली बाजी करमणुकीमुळे ज्येष्ठांचा उत्साह सिंगेला..

vishwatmaklokswamivarta