vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा१२० रुग्णवाहिकेद्वारे, ८६४३ वारकऱ्यांची आरोग्यसेवा..

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा१२० रुग्णवाहिकेद्वारे, ८६४३ वारकऱ्यांची आरोग्यसेवा..

छ. संभाजीनगर (प्रतिनिधी) : पंढरीच्या लक्षावधी वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन समस्येत तत्काळ आरोग्य सेवा उपलबद्ध होण्यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत. राज्यात भारत विकास गृपद्वारे (बीव्हीजी) १०८ रुग्णवाहिका सेवेची अमंलबजावणी केली जाते. आजतागायत ८६४३ वारकऱ्यांनी आरोग्यसेवाचा लाभ घेतला आहे.

वारकरी बांधवांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवेने पंढरपुर येथे नियंत्रण कक्ष तयार केला आहे. नियंत्रण कक्षाद्वारे पालखी सोहळ्याचे बारकाईने निरिक्षण करुन तत्काळ आरोग्यसेवा देण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. पायी वारी करताना भाविकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी. अशी सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेला केली होती. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेची अमंलबजावणी करण्यासाठी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी अवघ्या काही तासातच १२० रुग्णवाहिका पालखी सोहळ्यासाठी तैनात केल्या. रुग्णवाहिकेद्वारे १२० डॉक्टर व १२८ ड्रायवर वारकऱ्यांना २४ तास आरोग्यसेवा अर्पण करत आहेत.

‘भारताचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरीच्या वारीत भाविकांना आरोग्य सेवा देण्याची संधी आम्हाला मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो. माननीय आरोग्यमंत्री अबिटकर साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार अवघ्या काही तासातच पालखी सोहळ्यासाठी १२० रुग्णवाहिकेचे नियोजन आम्ही केले. वारकऱ्यांना आरोग्यमय वारी अनुभवता यावी, यासाठी २४८ आरोग्यदूत अहोरात्र कार्यरत आहेत. अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली.१०८ रुग्णवाहिकेचे वारीचे नियोजनमानाच्या १० पालख्यांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यात ९० बेसिक लाईफ सपोर्ट व ३० ॲडव्हांस लाईफ सपोर्ट या प्रकारातल्या रुग्णवाहिका आहेत.

पालखींची नावे खालिल प्रमाणे,1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )3) संत सोपान काका महाराज ( सासवड )4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )5) संत तुकाराम महाराज ( देहू )6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )7) संत एकनाथ महाराज ( पैठण )8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )9) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )10) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )अधिक माहितीसाठी संपर्क विशाल केदारी माध्यम समन्वयकमो. क्र : 7719860058, 8830590413

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे जलदिडींचे उत्साहात आयोजन,ढोल, टाळ, मृदूंगाच्या गजरात जलजागृतीचा संदेश,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन

vishwatmaklokswamivarta

खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्थापित 26 समित्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ओवे मैदान, खारघर येथे आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई