vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातूनसौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातूनसौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २७,८२६ फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर लावण्यात आले आहेत. या ग्राहकांना सौर तासांमधील विजेच्या वापरावर बिलामध्ये १० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील जवळपास सर्वच राज्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर लावत असून या योजनेसाठी केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला २९ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. स्मार्ट मीटर लावण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, त्यातून चार विविध कंपन्यांना काम देण्यात आले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यातील विजेचे दर कमी आहेत. स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्याची सक्ती करण्यात आली नसून या मीटरमध्ये प्रत्येक युनिटचे कॅलक्युलेशन ऑटोमॅटिक होत असल्याने वीज देयकामध्ये वाढ होण्याची शंका निर्माण होण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोळीवाडे आणि वन जमिनीवरील ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन योजना तयार करण्यात येईल आणि ती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसनं केलेल्या निंदनीय वक्तव्याचा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांची लोकसभेत माफी मागावी, असं रिजिजू म्हणाले.

vishwatmaklokswamivarta

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया