vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

जयश्री सोनकवडे यांची जातीय द्वेषभावनेतून बदनामी करणाऱ्या विरूध्द कारवाई करा महिला कॉग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांची सामाजिक मंत्र्याकडे मागणी.

जयश्री सोनकवडे यांची जातीय द्वेषभावनेतून
बदनामी करणाऱ्या विरूध्द कारवाई करा
महिला कॉग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांची सामाजिक मंत्र्याकडे मागणी.

जालना (प्रतिनिधी) : जात पडताळणी समितीच्या विभागीय उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांची जातीय द्वेषभावनेतून बदनामी करणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात महिला कॉग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात नंदा पवार यांनी म्हंटले आहे की, श्रीमती जयश्री सोनकवडे ह्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या विभागीय जात पडताळणी समितीच्या विभागीय उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. एका मागासवगय कुटुंबातील जयश्री सोनकवडे यांनी मेहनतीने आपलं शिक्षण पूर्ण कुरुन एक महिला असतांना सुद्धा मोठ्या पदावर पोहचल्या. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झालेल्या श्रीमती जयश्री सोनकवडे यांची सामाजिक न्याय विभागातील काही कामचुकार व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी महिलांना हाताशी धरून बदनामी करण्याचा उद्योग सुरू केला. प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांच्या गलथान आणि निष्क्रिय कामामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सुरू असलेल्या जालना येथील आन्वी, तुपेवाडीच्या आश्रमशाळेची 2019 मध्ये सोनकवडे ह्या उपसंचालक असतांना त्यांनी चौकशी केली. नंदिनी पवार या विद्यार्थ्यांनीचा उपचार न दिल्याने तडफडून मृत्यू झाला आणि फुलमाळी या विद्यार्थ्यांस उपचारांसाठी रुग्णालयात लवकर दाखल करण्यात आले नसल्याने त्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला आहे. याबाबत तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन सोनकवडे यांनी दिले होते. यांचा राग मनात धरून समाजकल्याण विभागाच्या जातपडताळणी उपआयुक्त जयश्री सोनकवडे यांना बदनाम करण्यासाठी समाज कल्याण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांनी महिलांच्या माध्यमातून षडयंत्र रचले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मृत्यू प्रकरणात दोषी असूनही समाज कल्याण विभागाने प्रादेशिक उपायुक्त जलील शेख याचे निलंबन केले नाही. व अजूनही चौकशी केलेली नाही. एका आदिवासी गरीब कुटुंबातील मुलांना आजही न्याय मिळाला नाही. उपरोक्त प्रकरणात आपल्यावर कारवाई केली जाईल, या भीतीने जलील शेख व सध्या प्रादेशिक उप आयुक्त दिपक खरात हे महिलांना हाताशी धरून व खोटे आरोप करून श्रीमंती सोनकवडे यांची बदनामी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एका मागासवगय तसेच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या श्रीमती सोनकवडे यांची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई यावी अशी मागणी देखील या निवेदनात नंदा पवार यांनी केली.

संबंधित पोस्ट

कॉंग्रेसचे 22 आमदार भाजपात जाण्यास सज्ज, ठाकरे गटाकडून गौप्यस्फोट

vishwatmaklokswamivarta

रशियाला पाकिस्ताचा पाठिंबा;’आर्थिक फायद्या’साठी व्यापारी करारावर स्वाक्षरी..

एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विरोधक आक्रमक

vishwatmaklokswamivarta

सामान्य माणसापुढे महागाईचे संकट , बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाहीत,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांची सरकारच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका…

vishwatmaklokswamivarta

सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही कारण , शिवसेना मुखपत्र दैनिक सामनामधील  ‘रोखठोक’ या सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

दिल्लीतल्या कनॉट प्लेस परिसरातल्या हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य आज महाआरती करणार