vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुक; 21 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुक; 21 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

बुलढाणा, प्रतिनिधी): जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांनी ‘ई’ वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हणजेच ज्या संस्थांमध्ये 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सदस्य आहेत, त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलमध्ये समाविष्ट होण्यासाठी शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी-कर्मचारी, वरिष्ठ लिपिक किंवा त्याहून अधिक दर्जाचे कर्मचारी, प्रमाणित लेखापरीक्षक, वकील तसेच शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतून निवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी (ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नाही) अर्ज करू शकतात.

या पॅनेलसाठी आवश्यक असलेले विहित नमुन्यातील अर्ज 21 जुलै 2025 पासून ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत उपलब्ध असतील. हे अर्ज शासकीय सुट्ट्या वगळून, कार्यालयीन वेळेत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांच्या कार्यालयात (सहकार संकुल, कांता नगर) मिळवता येतील. कार्यालयाच्या जाहीर नोटीस बोर्डवरही अर्जाचा नमुना प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपले अर्ज 21 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात सादर करावेत. यामुळे ‘ई’ वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका वेळेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यास मदत होईल.

0000

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा*- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्य प्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta