vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन*5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक*

*सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन*5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक*

लातूर, प्रतिनिधी: पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच 20 जुलै पासून 20 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

 अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील. ही स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट,ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी ‘गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे 4 जिल्हे प्रत्येकी 3 आणि हे 4 जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख ‘रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

८ मार्च महिला दिना निम्मीत्त मुख्य डाकघर छत्रपती संभाजीनगर येथे बचत महामेळाव्याचे आयोजन – श्री सुरेश बन्सोडे

मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

इयत्ता १२ वी परीक्षा; जिल्हाधिकाऱ्यांनी केलीपरीक्षा केंद्रावरील सोई सुविधांची पाहणी..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळावे ही शासनाची भूमिका- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

रस्त्यांवरील माती सफाई करून वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबईत सर्वत्र सखोल स्वच्छता…

vishwatmaklokswamivarta