vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

८ मार्च महिला दिना निम्मीत्त मुख्य डाकघर छत्रपती संभाजीनगर येथे बचत महामेळाव्याचे आयोजन – श्री सुरेश बन्सोडे

८ मार्च महिला दिना निम्मीत्त मुख्य डाकघर छत्रपती संभाजीनगर येथे बचत महामेळाव्याचे आयोजन – श्री सुरेश बन्सोडे

 

छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद- महिला दिना निम्मीत्त मुख्य डाकघर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जुना बाजार येथे बचत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले श्री सुरेश बन्सोडे यांनी एका पत्राद्वारे माहिती दिलेली आहे.
टपाल खात्यामार्फत अल्पउत्पन्न गट असंघटित कामगार, रोजंदारी कामगार यांच्यासाठी विविध प्रकारच्या बचत योजना राबविल्या जातात तसेच महिलांचे आर्थिक सबलीकरण व्हावे त्या दृष्टीनेही टपाल खात्यामार्फत सुकन्या समृदधी योजना राबवली जात आहे व त्यास अत्यंत उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या ८ मार्चच्या महिला दिनाचे औचित्य साधुन मुख्य डाकघर छत्रपती संभाजीनगर येथे माहिलांसोबतच इतरही घटकांना टपाल खात्या मधील बचतीचे महत्व समजावे व माहिलांचे आर्थिक सबलीकरण व्हावे या हेतूने या बचत महामेळाव्याचे आयोजन केले आहे.

या महामेळाव्यामध्ये टपाल खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या सुकन्या समृदधी योजना, आरडी, फिक्स डिपॉजिट योजना, मासिक प्राप्ती योजना, पीपीएफ, जेष्ठ नागरिक बचत योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, विविध प्रकारच्या विमा योजना, आधार कार्ड अपडेट करणे इत्यादींची सखोल माहिती औरंगाबाद विभागाचे अधिक्षक श्री जी. हरिप्रसाद व मुख्यडाकपाल श्री सुरेश बन्सोडे देणार आहेत. त्याच बरोबर विविध सामाजिक क्षेत्र, बचत गटाचे प्रतींनिधी देखील मार्गदर्शन करणार आहेत. तरी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, मेळाव्यास येतांना सर्वांनी सोबत आधार कार्ड पॅन कार्ड, दोन पासपोर्ट फोटो, मुलीच्या जन्मतारखेचा दाखला घेऊन दिनांक ८ मार्च रोजी ठीक ३ वाजता जुना बाजार मुख्यडाकघर येथे हजर रहाणे जेणेकरुन लाभार्थ्यांना त्याच दिवशी पुस्तकाचे वितरण देखील केले जाईल असे आवाहन श्री सुरेश बन्सोडे मुख्यडाकपाल, श्री प्रकाश अहिरे डेप्युटी पोस्ट्मास्टर, श्री वाय जे पैठणे डेप्युटी पोस्ट्‌मास्टर II, श्री विनय चामाणिकर सहाय्यक डाकपाल, श्री अनिल शेळके जनसंपर्क अधिकारी, श्री सहदेव सातपुते, मार्केटींग एक्झिक्युटिव्ह, श्री भारत गुंजवटे मॅनेजर बिझिनेस पोस्ट सेंटर इत्यादिनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण आणणार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा खासदार बळवंत वानखडे यांचे आवाहन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ७५ हजार विद्यार्थी एका सुरात गाणार गीत…

vishwatmaklokswamivarta

महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ  भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबद्ध – जिल्हाधिकारी दिलीप स्वामीश्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुविधांचा आढावा..

विशेष – लेख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-2)

vishwatmaklokswamivarta