vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचेशासकीय सेवेत घवघवीत यश..

मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचेशासकीय सेवेत घवघवीत यश..

        सांगली, प्रतिनिधी) : सामाजिक न्याय विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ घेऊन अनेकांनी आपले जीवनमान उंचावले आहे. याची प्रचिती मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत घवघवगीत यश मिळवल्यामुळे ठळक झाले आहे.

  सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कडेगाव येथील आठ विद्यार्थ्यांनी व विटा येथील दोन विद्यार्थ्यांनी सन 2024-25 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बॅकिंग स्पर्धा परीक्षा व इतर सरळसेवा परीक्षामधून शासकीय सेवेमध्ये यश संपादन केले.    सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कडेगाव येथील विद्यार्थी सुशांत गावडे यांनी कृषी अधिकारी (बँक ऑफ इंडिया), विशाल शिंदे यांनी कृषी विस्तार अधिकारी (सिंधुदुर्ग), शिवप्रसाद गुरव यांनी मंत्रालय सहाय्यक, स्वप्नील कोकरे यांनी मुंबई पोलीस, अजिंक्य आढारी यांनी कृषी अधिकारी (कॅनरा बँक), अतुल सावंत यांनी मंत्रालय सहाय्यक, सुशांत पवार यांनी कर सहाय्यक व महसूल सहाय्यक तर विकास गेजगे यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून सन 2024-25 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग स्पर्धा परीक्षा व इतर सरळसेवा परिक्षेमध्ये यश संपादन केले. आतापर्यंत या वसतिगृहातील एकूण 18 विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत यश संपादन केले आहे. यामध्ये केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक-01. भारतीय सैन्य दल- 5 मुंबई पोलीस – 02, बैंकिंग सेवा -2, महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यात -08 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.  सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह विटा येथील विद्यार्थी कार्तिक कांबळे याने भारतीय सैन्य दलात तर रोहन ऐवळे याने मुंबई पोलीस दलात सन 2024-25 मध्ये शासकीय सेवेत यश संपादन केले. आत्तापर्यंत या वसतिगृहातील एकूण 6 विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत यश संपादन केले आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक-01, भारतीय सैन्य दल-2, मुंबई पोलीस 01 व महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यात 02 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समाजकल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी अभिनंदन केले.000000

संबंधित पोस्ट

यंदाचा उत्सव होणार आणखी खास!-नवी मुंबई महानगरपालिका महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धा २०२६–२७ अंतर्गत आयोजित ५ दिवसीय घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या घरच्या गणरायाच्या उत्सवाला मिळवून द्या मानाचा सन्मान!

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला निधीची कमतरता भासू देणार नाही- क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त भाजपाची जिल्हा कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य घराघरात पोहोचवूया – जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याभरात सामाजिक कार्यक्रम राबविणार – महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

हमीभाव खरेदी प्रक्रियेत बारदाना कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी-पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता