vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  रायगड ( प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी कळविले आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या कडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.

तरी दि.13 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

आठवी आर्थिक गणना; प्रशासनाची पूर्वतयारी सुरु

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवरायांना मानवंदना देत ‘दुर्गोत्सव’ या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होण्याचे महाराष्ट्र शासनाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

सिर्फ दिल, बिना बिल-डॉ.ओमप्रकाश शेटे यांचा नवी मुंबईतील रुग्णालयांची केली पाहणी,मोफत आरोग्यसेवेचं केले प्रत्यक्ष निरीक्षण..

रेल्वे मंत्रालयानं लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाडयांच्या तिकीटात किंचित दरवाढ केली असून,नवे दर आज पासून लागू होणार.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग कार्यालयाच्या नावात बदल• ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ या नावाने पत्रव्यवहार करण्याचे आवाहन