vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मनपा नियोजन विभागातून समाज संघटक दिनेश गमरे  सेवानिवृत्त

 मनपा नियोजन विभागातून समाज संघटक दिनेश गमरे  सेवानिवृत्त

 

मुंबई प्रतिनिधी –

गेली सदतीस वर्ष महानगरपालिका शिक्षण विभागासह नियोजन विभागात कार्यरत असणारी समाज संघटक श्री दिनेश पांडुरंग गमरे हे दिनांक 31 जुलै 2025 रोजी नियोजन विभागातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले त्यावेळी नियोजन विभागातील दादर येथील सभागृहात दुपारी तीन ते पाच या वेळात श्री गमरे यांचा खात्यांतर्गत व आजी-माजी कर्मचारी हितचिंतक नातेवाईक यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी नियोजन श्रीमती शशिकला पाटील मुख्य समाज विकास अधिकारी श्री भास्कर जाधव सत्कारमूर्ती श्री दिनेश गमरे व त्यांच्या पत्नी स्नेहा गमरे यांच्यासह शिक्षण विभाग समाजसेवा प्रकल्प माजी प्रमुख समन्वय श्रीमती गीता मोरे पाटील ही मान्यवर मंडळी उपस्थित होती

 या कार्यक्रमादरम्यान श्री गमरे सह मनपा सेवेत असताना शिक्षण विभागासह नियोजन विभागातून सेवानिवृत्ती झालेले त्यांचे हितचिंतक सहकारी श्री दिलीप गाडेकर श्री तुकाराम सुरकुंडे श्री अशोक भिंगारदिवे श्री मुकुंद मोरे श्री जेके कुंभार श्रीमती स्नेहा जाधव यांच्यासह सध्या कार्यरत असलेले काही समाजविकास अधिकारी व समाज संघटक यांनी श्री गमरे गमरे यांच्या कामाबद्दल जुन्या नवी आठवणी व कार्यकर्तुत्वाबद्दल मनोगत व्यक्त केले

 त्यानंतर नियोजन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी नियोजन व मुख्य समाज विकास अधिकारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र भेटवस्तू आणि श्री व सौ दोघांनाही घड्याळ देऊन आदर सत्कार करण्यात आला यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट व हास्य जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले अधिकारी वर्गांनी गमरे यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले सत्कारमूर्ती श्री गणेश गमरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे कामाच्या बाबतीत आभार मानले काम करताना काही चुकलो असेल कोणाला काही बोललं असेल तर माफ करावे यापुढेही मी आपणाशी त्याच प्रेमाने आदराने सहकारी म्हणून संबंध ठेवीन याची ग्वाही दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप लोंढे यांनी अतिशय उत्कृष्ट प्रमाणे केले या कार्यक्रमाकरिता हर्षद यादव नाग लाटे जेलसिंग सुभाष आगरी मारुती आवळे विलास रुपनर या सर्वांनी नियोजन करून कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडला

संबंधित पोस्ट

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

vishwatmaklokswamivarta

ज्ञानज्योती व वसतिगृह प्रवेश योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!17 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

बोले तैसा चाले…!अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा१३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश..

नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहान**रिपब्लिकन पक्षाचा जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा* 

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण..

सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनानिमित्त ध्वजवंदन