vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी ‘एनएसओ’तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; ‘संख्या मित्रां’ मार्फत होणार माहिती संकलन

देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी ‘एनएसओ’तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन

रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; ‘संख्या मित्रां’ मार्फत होणार माहिती संकलन

            जालना, प्रतिनिधी : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) देशातील सामाजिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेली विविध सर्वेक्षणे नियमितपणे राबवत आहे. या सर्वेक्षणांद्वारे रोजगार, उद्योग, महागाई, शेती, स्थलांतर, कोळसा उत्पादन आणि सेवा क्षेत्राशी संबंधीत विश्वासार्ह माहिती संकलित केली जाते. ही माहिती केंद्र व राज्य सरकारला विकास आराखडे तयार करण्यासाठी, विविध योजना आखण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

सन 2026-27 या कालावधीत NSO मार्फत विविध महत्त्वाची सर्वेक्षणे राबविण्यात येणार असून त्यामध्ये सांख्यिकी अधिकारी, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सर्वेक्षण पर्यवेक्षक तसेच सर्वेक्षण गणक यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS): नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) हा सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) अंतर्गत असलेल्या ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया’द्वारे (NSO) केला जाणारा एक देशव्यापी घरगुती सर्वेक्षण उपक्रम आहे. यातून भारतातील रोजगार आणि बेरोजगारीबाबत नियमित व व विश्वसनीय माहिती उपलब्ध होते. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO (कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल, तपासणीचे काम एसएसओ (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे केले जाणार आहे.

असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) : निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये आस्थापनांचे सर्वेक्षण. असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण’ (ASUSE) हे अर्थव्यवस्थेतील योगदान मोजण्यासाठी भारतातील असंघटित (अनौपचारिक) बिगर कृषी उद्योगांची माहिती संकलित करते. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल, तपासणीचे काम एसएसओ (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे.

किंमत संकलन (ग्राहक किंमत निर्देशांक-CPI : शहरी / ग्रामीण / कृषी मजूर / ग्रामीण मजूर) निवडक बाजारपेठांमधील दुकानांमार्फत किमतींचे संकलन केले जाईल : ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) अंतर्गत, गणक एका निश्चित वेळापत्रकानुसार निवडक दुकाने, बाजारपेठा, सेवा प्रदाते आणि संस्थांकडून प्रत्यक्ष किरकोळ किमती गोळा करतात. वस्तूंची यादी आणि वजन हे नवीनतम उपलब्ध घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणावर आधारित असतात. सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) सर्वेक्षणाचे प्राथमिक काम करेल. तपासणीचे काम एसएसओ (वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी) आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे.परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण (SAS) आणि अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण (AIDIS) :सिच्युएशन असेसमेंट सर्व्हे’ (SAS) भारतामधील शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती संकलित करतो. याद्वारे शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न आणि उपभोग यांचे मूल्यांकन केले जाते.’ऑल इंडिया डेट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हे’ (AIDIS) ग्रामीण आणि शहरी भागातील भारतीय कुटुंबांची मालमत्ता, देयता (कर्ज) आणि गुंतवणुकीचे स्वरूप याबाबत सर्वसमावेशक माहिती पुरवितात. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल; तर तपासणीचे काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे केले जाईल.

स्थलांतर तपशील सर्वेक्षण (MPS) – निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये सर्वेक्षण :स्थलांतर तपशील सर्वेक्षण’ (MPS) हे भारतातील कुटुंबे आणि व्यक्तींच्या स्थलांतराच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे, जेणेकरून पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मितीस मदत होईल. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम JSO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे केले जाईल,तर तपासणीचे काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे केले जाईल.निवडक शहरी विभाग आणि गावांमध्ये राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण :राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण (NHIS) चा उद्देश देशभरातील कौटुंबिक उत्पन्न आणि उत्पन्नाच्यावितरणाबाबत विश्वसनीय अंदाज तयार करणे हा आहे, ज्यामुळे भारतातील अधिकृत आकडेवारीतील दीर्घकाळापासून असलेली उणीव भरून काढली जाईल. सर्वेक्षणाचे प्राथमिक काम ISO आणि सर्वेक्षण गणक (संख्या मित्र) यांच्याद्वारे जाणार आहे. तर तपासणीचे काम SSO आणि सर्वेक्षण पर्यवेक्षक यांच्याद्वारे जाणार आहे.

निवडक संस्थांमधील निगमित सेवा क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASISSE) :नोंदणीकृत सेवा क्षेत्रातील उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASISSE) हे नोंदणीकृत सेवा क्षेत्राला समर्पित असलेले भारतातील पहिले वार्षिक सर्वेक्षण आहे. कॉर्पोरेट सेवा-क्षेत्रातील उपक्रमांवर एक व्यापक डेटाबेस विकसित करण्यासाठी हे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे (NSO) आयोजित केले जाते. डेटा संकलनाचे प्राथमिक काम SSO/JSO करणार आहेत.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत राबविण्यात येणारी ही सर्वेक्षणे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा वस्तुनिष्ठ आढावा देणारी आहेत. या सर्वेक्षणांतून मिळणारी विश्वासार्ह आकडेवारी शासनाला लोकाभिमुख योजना तयार करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी आणि विविध क्षेत्रांतील अचूक धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आधार ठरणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

माहिती उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांना कोल्हापूर विभागाच्या वतीने श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

जनतेला शासकीय सेवांचा लाभ वेळेत मिळेल याची खबरदारी घ्या – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून  सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराज यांची पनवेल महापालिकेस भेट- विविध विकास कामांचा घेतला आढावा