vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना; 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना; 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

 

बुलढाणा प्रतिनिधी: इयत्ता 9 वी व 11 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय(OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘टॉप क्लास स्कूल एज्युकेशन’ शिष्यवृत्ती योजना सन 2026-27 साठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक दिपाली पाडवी यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ केवळ इयत्ता 9 वी आणि 11 वीमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अर्जासाठी जात प्रमाणपत्र(OBC/EBC/DNT), वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र, मागील इयत्तेचे गुणपत्रक, शाळेचे प्रवेश किंवा अभ्यास प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शाळेच्या इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर (INO) यांना अर्जाची माहिती देणे आवश्यक आहे, जेणेकरून शाळेकडून अर्जाची ऑनलाईन पडताळणी वेळेत पूर्ण करता येईल. सन 2026-27 साठी योजनेचा प्रारंभ 1 जून 2026 रोजी झाला असून, 31 ऑक्टोबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. त्रुटी असलेल्या अर्जांची तसेच संस्थेमार्फत पडताळणीची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2026, तर जिल्हा, राज्य व मंत्रालय स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 आहे. पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

माजी सैनिकांसाठी सांगलीत 8 एप्रिलला शिबीर

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड 

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

सांस्कृतिक कार्य विभागाकडून दुष्काळग्रस्त भागात रोजगारनिर्मिती आणि जलसंवर्धन-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा• बारवांचे पुनरुज्जीवन• संरक्षित स्मारकांच्या देखभालीतून रोजगार• लोककलावंताना मदत होईल असेच कार्यक्रम करणार• दुष्काळासाठी मदत करणाऱ्यांना रवींद्र नाट्यमंदिर मोफत• सांस्कृतिक कार्यक्रमांचा २५ कोटी निधी बारवांसाठी वळवणार