vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी अशोकराव आगलावे सर्वांच्या सहकार्‍याने फेस्टीवल दणदणीत साजरा करु-अशोकराव आगलावे

जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी अशोकराव आगलावे सर्वांच्या सहकार्‍याने फेस्टीवल दणदणीत साजरा करु-अशोकराव आगलावे

जालना प्रतिनिधी : जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता अशोकराव आगलावे यांची सर्वानुमते आज रविवारी निवड करण्यात आली. दरम्यान, जालना गणेश फेस्टीवल यंदाही सर्वांच्या सहकार्याने दणदणीत साजरा करु, अशी ग्वाही नुतन अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंते अशोकराव आगलावे यांनी येथे बोलतांना दिली.

जालना गणेश फेस्टीवलची डॉ. संजय लाखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात बोलावण्यात आलेल्या बैठकीत श्री. आगलावे हे बोलत होते. प्रारंभी श्री. आगलावे यांचा मावळते अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी सत्कार करुन पदभार त्यांच्याकडे सोपवला. यावेळी फेस्टीवलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, दिनेश फलके, माऊली कदम, अशोक उबाळे, शरद देशमुख, किरण गरड, माजी अध्यक्ष साईनाथ पवार, माजी कार्याध्यक्ष सुरेश मुळे तसेच प्रा. राजेंद्र भोसले, चंद्रशेखर वाळिंबे, रविंद्र हुसे, गणेश सुपारकर, सतीशराव देशमुख, अविनाश भंडे, अनिल व्यवहारे, मधुकर मुळे, संजय देशमुख, राहुल सुपारकर, प्रशांत जिगे, प्रसाद वाढेकर, अजिंक्य घोगरे, दशरथ शिंदे, उदय देशमुख, रोहित देशमुख, धनराज काबलिये, संताजी वाघमारे, आदींसह गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी आपले विचार मांडून साधक- बाधक चर्चेत सहभाग नोंदवला. तर शेवटी उपस्थितांचे आभार जगत घुगे यांनी मानले.

पुढे बोलतांना श्री. आगलावे म्हणाले की, आपणासर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडण्यात आपण यशस्वी होऊत, यात शंका नाही. अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार कार्यक्रमांची मेजवाणी यंदाही देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आपणा सर्वांची साथ आणि गणपती बाप्पाचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत, असेही शेवटी श्री. आगलावे म्हणाले.(छाया : अनिल व्यवहारे)

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीत दिला

पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे**जिल्हाधिकारी संतोष पाटील*

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द राज्यपालांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला कौतुकाची थाप

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण