vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पोलीस मुख्यालयात अवयव दान जनजागृती अभियान संपन्न

पोलीस मुख्यालयात अवयव दान जनजागृती अभियान संपन्न

बुलडाणा, प्रतिनिधी अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत येथील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानात अवयव दान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक डॉ. लध्दड व त्यांची संपूर्ण टीमने अवयव दानाचे महत्त्व व प्रक्रिया संदर्भात जनजागृती केली.

जनजागृती कार्यक्रमात कृत्रिम श्वसन पद्धत (CPR) प्रशिक्षण देण्यात आले. तसेच अवयव दानाचे महत्त्व, प्रक्रिया व सामाजिक बांधिलकीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थितांना अंगदानाच्या माध्यमातून होणारे जीवदान व समाजातील या उपक्रमाची गरज यावरही प्रकाश टाकण्यात आला.

  याप्रसंगी पोलिस निरीक्षक श्री. पावरा, राखीव पोलिस निरीक्षक विकास तिडके, पोलिस निरीक्षक दिनकर गावीत, जि.वि.मा.अ. राजेश धुताडमल, डॉ. प्रवीण घोंगटे, डॉ. शिंदे(DPS), नेत्र समुपदेशक योगेश शिरसाट, सौरव हिवाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास पोलिस कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

000000

संबंधित पोस्ट

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद

vishwatmaklokswamivarta

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी,करुन अहवाल द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे यंत्रणेस निर्देश…

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

वक्फ बचाव’ परिषद जालन्यात २८ जून रोजीप्रमुख इस्लामी विद्वान व नेते वक्फ कायद्यातील सुधारणांवर भाष्य करणार…