vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत-सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकर वारसा सह्याद्रीचा एम.आय.टी. महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, येथे होणार भव्य सांस्कृतिक कार्यक्रम,पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार सांस्कृतिक कार्यक्रम…

महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत-सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकर वारसा सह्याद्रीचा एम.आय.टी. महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, येथे होणार भव्य सांस्कृतिक कार्यक्रम,पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार सांस्कृतिक कार्यक्रम…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार सांस्कृतिक कार्यक्रम एका खास सांस्कृतिक कार्यक्रम “वारसा सह्याद्रीचा” आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संकल्पनेतून साकारत आहे. दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 7 वा. एम.आय.टी. महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे उदघाटन कार्यक्रमात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी वारसा सह्याद्रीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाचे विविध सादरीकरण रसिकांसाठी सादर होणार आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ग्रामपंचायत निवडणूक : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली तात्पुरती बंद-बस ट्रॅकर ॲपवर परिणाम

vishwatmaklokswamivarta

सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कायदेविषयक जनजागृती शिबिरास प्रतिसाद..

नवीन आधार केंदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा