vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली तात्पुरती बंद-बस ट्रॅकर ॲपवर परिणाम

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली तात्पुरती बंद-बस ट्रॅकर ॲपवर परिणाम

     नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या आयटीएमएस (ITMS – Integrated Transport Management System) सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने एनएमएमटी ची बस ट्रॅकर ॲप सेवा (NMMT Bus Tracker App) सेवा सद्यस्थितीत बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना या ॲपद्वारे बसगाड्यांविषयी माहिती ट्रॅक करता येत नाही व त्यांच्या ठिकाणांबाबतची माहिती उपलब्ध होत नाही.

            सदर तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी एनएमएमटीचा आयटीएमएस विभाग कार्यवाही करीत असून तांत्रिक टीममार्फत एनएमएमटी बस ट्रॅकर ॲप प्रणाली पुन्हा सुरळीत व सुरक्षितपणे कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत. अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना होणा-या असुविधेबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत दिलगिरी व्यक्त करण्यात येत असून सदर आयटीएमएस प्रणाली लवकरात लवकर पूर्ववत कार्यान्वित होईल असे सर्व प्रवासी व नागरिक यांना नमुंमपा परिवहन प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न…!केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन… ! !

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी रोजी बिहार येथून होणार पी.एम.किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे निधी वितरण..

vishwatmaklokswamivarta

ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल-भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..शिवसेनेच्या घोषणेने परिसर दणाणला..

vishwatmaklokswamivarta

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियरॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे लोकार्पण

जालना दर्गाह वक्फ मालमत्तेतील अनियमिततेवर त्वरित कारवाईची मागणी अर्जदारांचे व्यवस्थापन समितीला निवेदन

vishwatmaklokswamivarta

इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण

vishwatmaklokswamivarta