vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश..

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश..

मुंबई, प्रतिनिधी :- राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले, भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्तक रहावे.

   मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले की, शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत व दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने अतिवृष्टी, पुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत. या नुकसानीचा अहवाल संबधित विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावा, असेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाप्रलंबित प्रकरणांचे निराकरण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा संपन्न;शिक्षणातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढवा 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ३०३ जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान,सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट

जी.डी.सी. अण्ड ए .व सी. एच. एम. परीक्षेचा अर्ज भरण्यास 17 मार्चपर्यंत मुदतवाढ..

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार – एआय तंत्राचाही वापर , नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन स्थितीबाबत सर्वंकष आढावा-रक्तदात्यांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन