vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा

मुंबई, प्रतिनिधी: राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २२ आणि २३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथे होणार आहे.

राज्यस्तरावर कार्यरत आयोगांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणे, महिलाविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच देशव्यापी कृती आराखडा तयार करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. देशभरातील महिलांसमोरील सामाजिक प्रश्न, धोरणात्मक मुद्दे व विविध विषयांवर सखोल चर्चा यावेळी होणार आहे.

कार्यशाळेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्यासह ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक अशा विविध राज्यांतील महिला आयोगांच्या अध्यक्षा व सदस्य यामध्ये सहभागी होत आहेत. तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी वक्ते अनुभव व विचार मांडणार असून, १६० मान्यवरांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

एप्रिल २०२५ मध्ये राष्ट्रीय महिला आयोग व उत्तर प्रदेश महिला आयोग यांच्या सहकार्याने अशाच प्रकारची क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत होत असलेल्या या कार्यशाळेकडे देशभरातील महिला आयोगांचे लक्ष लागले आहे.

00p000

संबंधित पोस्ट

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार- मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प

ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली अर्पण; सदस्यांनी आठवणींना दिला उजाळा