vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची नागरिकांनी खरेदी करावी _जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.      

उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीची नागरिकांनी खरेदी करावी _जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी उमेद स्वयंसहायता बचत गटाच्या ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीचे विक्री स्टॉल जिल्हा परिषदेच्या औरंगपुरा येथील प्रांगणात उभारण्यात आले आहेत. या स्टॉल वरील गणेश मूर्तीची खरेदी जिल्ह्यातील नागरिकांनी करून महिला सक्षमीकरणास हातभार लावावा. असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. आज या विक्री स्टॉलला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली.

      जिल्ह्यातून गतवर्षी बचत गटाच्या माध्यमातून गणेश मूर्ती विक्रीतून तब्बल 5 कोटी रुपयांची उलाढाल केली होती. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूला विक्रीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर बाजारपेठ या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महिला आर्थिक सक्षमीकरणातील हे महत्त्वपूर्ण पाऊल असून महिला स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीचे खरेदी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी, करावी व यामधून बचत गटांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. महिला बचत गटातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण बचत गटाने तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीतून होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणा लावलेल्या या गणेश मूर्तीच्या विक्रीच्या स्टॉलच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण. तसेच त्यांच्या लघु उद्योगास पाठबळ मिळण्याचा उद्देश असल्याचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या गणेश मूर्तीचे विक्रेत्या महिला,जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा मार्केटिंग व्यवस्थापक सचिन सोनवणे यावेळी उपस्थित होते .

 जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेश मूर्तीच्या विक्रीचे स्टॉल छत्रपती संभाजीनगर -25, खुलताबाद-12 गंगापूर -17 फुलंब्री -10 कन्नड -20 वैजापूर -55 सोयगाव-20 सिल्लोड -50 पैठण- 11 या ठिकाणी पंचायत समिती इमारत व मोठ्या ग्रामपंचायत मध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये बजाज नगर म्हाडा कॉलनी, शेंद्रा एमआयडीसी, वाळुज एमआयडीसी, जय भवानी चौक वडगाव व जिल्हा परिषद मैदानावर 16 स्टॉल असे एकूण 236 स्टॉल उभारून गणेश मूर्तीची विक्री 27 ऑगस्ट 2025 पर्यंत केली जाणार आहे.

     भेटी दरम्यान सहायक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर, महिला बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ, सुचिता खोतकर, विभीषण भोईटे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे कर्मचारी व बचत गटातील महिला उपस्थित होते.

 

0000

संबंधित पोस्ट

नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल

बेसा-बेलतरोडी-पिपळा व परिसरातील विकासात नागरी सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मिहान प्रकल्पातील पुनर्वसन धोरणानुसार नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन