vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

   अमरावती, प्रतिनिधी: अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल वाहतुकी योग्य नसल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखपरिक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे जुना आरबीओ तोडून नवीन आरबीओ बांधण्यासाठी या उड्डाणपुलावरून होणारी सर्व वाहतुक पादचारीसह बंद करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरंचनात्मक परिक्षण अहवालाआधारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आवश्यक आहे.

 प्रवेश बंदी सर्व प्रकारचे वाहन पादचारीसह शहरात अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील राजकमल चौक, हमालपूरा, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलावरून सर्व प्रकारचे वाहनांना सदर उड्डाणपुलावरून पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहे.

    त्यामुळे पर्यायी मार्ग हमालपूराकडून येणारी प्रतिबंधित वाहने बस स्टँड मार्गे रेल्वे स्टेशन मर्च्युरी टी पॉईट असे यावे. बसस्थानककडून येणारी प्रतिबंधित वाहने बस स्टॅड मार्गे रेल्वे स्टेशन मर्च्युरी टी पॉईट असे यावे. राजकमल चौक व जयस्तंभ चौक कडून येणारी प्रतिबंधित वाहने हे राजापेठ पोलिस स्टेशन समोर राजकमल चौक-जयस्तंभ चौक-मालवीय चौक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

   सदर अधिसुचनेचे उल्ल्ंघन करणाऱ्याविरूध्द मोटार वाहन कायदा 1988 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी*एप्रिल महिन्यात एसआयआर मोहिम

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सांगली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी57 हजारांहून अधिक खात्याची माहिती अपलोड- जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण

कट प्रॅक्टिस खपवून घेतली जाणार नाही; शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.