vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी57 हजारांहून अधिक खात्याची माहिती अपलोड- जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण

सांगली जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी57 हजारांहून अधिक खात्याची माहिती अपलोड- जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण

सांगली, प्रतिनिधी.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यात माहिती अपलोड करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील 56 हजार 962 शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी दिली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाकडून उर्वरित प्रकरणांची पडताळणी व आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी दिली.
जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 57 हजार 112 खात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले आहे. लेखापरीक्षण व 99.74 टक्के खाती बँकेने पोर्टलवर अपलोड केली आहेत. जिल्ह्यात केवळ 150 शेतकऱ्यांची माहिती अपलोड होणे बाकी आहे. यापैकी 12 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण प्रलंबित, तर 129 खाती मयत वारस पूर्तता न झाल्यामुळे प्रलंबित आहेत.
बँकेने पोर्टलवर अपलोड केलेल्या खात्यांचा तालुकानिहाय आढावा घेतल्यास खानापूर आणि तासगाव या तालुक्यांनी 100 टक्के प्रगती साधली आहे. आटपाडी (९९.९१%), जत (९९.७५%), मिरज (९९.९५%), वाळवा (९७.९२%), कडेगाव (९९.९४%), पलूस (९९.९७%), शिराळा (९९.८७%) आणि कवठेमहांकाळ (९९.९२%) या तालुक्यांमध्येही काम अंतिम टप्प्यात आहे.
वाळवा तालुक्यात 94 प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी 91 प्रकरणांमध्ये मयत वारस पूर्तता झाली नाही. त्याचप्रमाणे जत तालुक्यात 41 प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी ३८ प्रकरणांमध्ये मयत वारस पूर्तता झाली नाही. त्यामुळे त्या प्रकरणांची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ८, १८, २८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसएमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार*

vishwatmaklokswamivarta

उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीउद्योग सुलभीकरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेग वाढणार..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta